"ओळख हिरकणी ची" - 27 सप्टेंबर.🎂उज्वला ताई सहाणे.🎂... साहेबराव माने.पुणे. 9028261973.
*"ओळख हिरकणी ची." - 27 सप्टेंबर.*
डॉ. उज्ज्वला ताई सहाणे.
*'प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स'*"या पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका आणि साहित्यिका.
सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.
*27 सप्टेंबर - वाढदिवसाचे औचित्य साधून..*
वाचनाच्या नादात मला ज्या अनेक हिरकण्या भेटल्या त्या सर्वांना मी फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप मध्ये सहभागी करून घेतले आहे. त्या पैकी पुण्यातील सांगवी येथील उज्ज्वला ताई सहाणे ह्या एक. त्यांची ओळख करुन घेताना माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. तुम्ही वाचल्यावर सुद्धा कदाचित तसचं होण्याची शक्यता आहे.
पदरी सहा महिन्याची असलेली मुलगी. जेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती ऐकू आणि बोलू शकणार नाही तेंव्हा पायाखालची वाळू सरकली असेल. पण हिम्मत हरली नाही. प्रेरणाला यथायोग्य शिक्षण देऊन एक भरतनाट्यम् नृत्यांगना तयार करण्यात उज्ज्वला ताई खऱ्या अर्थाने कर्तबगार महिला ठरल्या आहेत. हिरकणी ठरल्या असे म्हटले तर वावगे ठरू नये. ऐकू न येणारी प्रेरणा ही त्यांची मुलगी आज निव्वळ संगीताच्या ठेक्यावर असलेल्या भरतनाट्याम् ची आवलिया कलाकार म्हणून नावारूपाला आली आहे. तीचे नाट्यचित्र मंदिरात भरतनाट्याम् चे शो आयोजित केले जातात.
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*'कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना : प्रेरणा सहाणे-दीक्षित' आत्मकथा सादरीकरण - डॉ उज्ज्वला सहाणे.*
https://youtu.be/craxpVhpc9w
*"प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स"* हे प्रेरणाचे आत्मकथारुपी पुस्तकासाठी 9922213695 ह्या नंबर वर संपर्क साधावा. 🙏
https://youtu.be/I19pSWl8dnU
*☝️डॉ. उज्ज्वला ताई सहाणे यांनी लिहिलेल्या "प्रेरणा द साउंड आॅफ सायलेन्स" या पुस्तकाच्या संदर्भात मुलाखत घेतली आहे नेहा बोरकर यांनी.*
राष्ट्रीय पुरस्काराच्या भव्य दिव्य सोहळ्यात अत्यंत आत्मविश्वासाने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणारी ही आहे पुण्याची प्रेरणा सहाणे. बालपणी अपघाताने 100% कर्णबधिर होऊनही त्यावर जिद्दीने मात करून जे ऐकूच येत नाही त्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी करून दाखवली. त्यामागे जिद्द आणि अपार कष्ट आहेत. तिचा हा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता सदैव मनाला लागलेली असते आजच्या या व्हिडिओतून आपण तिचा हा थक्क करणारा आणि अडीअडचणींवर मात करणारा प्रवास कसा होता हे तिची आई डॉ. उज्ज्वला सहाणे यांच्या कडून ऐकू व काही क्षणचित्रे सुद्धा पाहू. मनाला नवी प्रेरणा नवी ऊर्जा देणारी प्रेरणा प्रत्यक्ष आपल्या भेटीला ह्या व्हिडिओतून येत आहे.
उज्ज्वला ताई 🙏
*HAT'S OF YOU.*
🥇🥉
प्रेरणा ची आई म्हणून असलेली तुमची ओळख हिरकणी च्या दर्जाचीच आहे.
तुम्हाला सत्यम् शिवम् सुंदरम् च्या दोन्ही आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुप कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
🌹💐🎂
*जिद्द, चिकाटीमुळे नृत्यात वेगळा ठसा. जुनी सांगवीतील कर्णबधिर प्रेरणा सहाणे ठरतेय रोल मॉडेल.*
संकलन - साहेबराव माने. पुणे.
9028261973.
जुनी सांगवी, पुणे येथील मधुबन सोसायटी ही क्रीडा संगीत, कला व साहित्य क्षेत्रातील दिगजांच्या वास्तव्यामुळे सतत प्रकाशझोतात असते. क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रेरणा केशव सहाणे यासारख्या विविध क्षेत्रांत नाव कमावलेल्या दिग्गजांमुळे आपसूकच मधुवन सोसायटीचे नावही आता देशपातळीवर झळकते आहे.
प्रेरणा सहाने म्हणजे जिद कष्ट कर्णबधिरतेवर मात करत व आयुष्यात आलेल्या विविध प्रसंगांना संघपाने तोंड देणार व्यक्तिमत्त्व. तरुण-तरुणींसाठी तिचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रेरणा ही सहा महिन्यांची असताना तिला अर्धांगवायूचा झटका आला. त्यात मेंदूतील श्रवणकेंद्र पूर्णपणे निकामी झाले. त्यामुळे तिला शंभर टक्के कर्णबधिरता आली. परिणामी वाणीही गेली. यात श्रवणयंत्राचा उपयोग झाला नाही. तो आता कला शाखेच्या शेवटच्या वर्षाला आहे. तसेच, ती भरतनाट्यम नृत्याच्या विशारदपर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण आहे.
पुण्यातील संगीत गुरु शुमिता महाजन यांनी सूर, ताल ऐकू न येणाऱ्या प्रेरणाला भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. १६ वर्षे तिच्या गुरूंनी तिच्यावर अनेक प्रयोग करून अत्यंत कष्टाने तिला शिकवले. पण, एक दिवस तिच्या शरीरातच संगीत, सूर, ताल आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचे 'अरंगेत्रम' म्हणजे नृत्याचा पहिला 'स्टेज शो करण्याचे ठरविले. पहिला कार्यक्रम २००७ मध्ये टिळक स्मारक मंदिर, पुणे या ठिकाणी एक हजार लोकांच्या उपस्थितीत झाला. गायक आणि वादकांच्या साक्षीने तिच्या एकटीचे अडीच तासांचे अरंगेत्रम सादर झाले. शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यममध्ये हा कार्यक्रम झाला. तिथून तिने आजवर संघर्ष करत कधी मागे वळून पाहिले नाही. तिने भरतनाट्यम व फ्युजन संगीतावर आधारित मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड औरंगाबादसह महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही प्रयोग केले. ३० मे २००५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे 'नाद' या कार्यक्रमात तिला व्यावसायिक नृत्यांगना म्हणून सादर करण्यात आले. तिने आतापर्यंत ७५ पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. तिला भारत सरकारकडून ३ डिसेंबर २०१५ रोजी रोल मॉडल या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
*अनेक पुरस्कारांनी सन्मानित...*
२००८ मध्ये डॉ. अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामार्फत संघर्ष सन्मान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा रुक्मिणी पुरस्कार, भारत प्रेरणा पुरस्कार, दिव्यांग गौरव पुरस्कार, जिद पुरस्कार, ब्रिलियंट अचिव्हमेंट अॅवॉर्ड टर्फ क्लब आदी ३५ पुरस्काराने गौरविण्यात आले. *प्रेरणाच्या आई डॉ. उज्वला सहाणे यांनी प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स' हे तिचे आत्मचरित्र लिहिलेले आहे.* यास राज्य सरकारचा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कारही मिळालेला आहे. त्यातून अनेकांना निराशेतून बाहेर येण्याची प्रेरणा मिळते आहे. असे आई उज्ज्वला सांगतात. संगीत व गीत ऐकूच येत नसताना त्यावर मोठमोठे स्टेज शो करणे ही अत्यंत अवघड गोष्ट ती सहजतेने करते. यात तिच्या देदीप्यमान कामगिरीचा प्रवास सुरू आहे.
*पुस्तक परीक्षण । "प्रेरणा: द साउंड ऑफ सायलेन्स...'*
... माधुरी तळवलकर
“प्रेरणा’ ही कथा आहे, एका अथक लढाईची आणि जिद्दीची. डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी “प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स…'’ या पुस्तकातून त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगितली आहे. श्रीमंत कुटुंबातील उज्ज्वला आंतरधर्मीय विवाह करते.
त्यांना सुरेख मुलगी होते आणि काही महिन्यांतच मुलीला म्हणजे प्रेरणाला पॅरालिसिसचा ऍटॅक येतो. हे दोघे शिक्षक. नोकरी सोडून चालणार नसते. संस्थाचालकांचे कायम अडवणुकीचे धोरण. सासर-माहेरचा आधार नाही. मुलीच्या आजारपणाचा धक्का. डॉक्टरांचे विचित्र अनुभव.
प्रेरणाला उभंसुद्धा राहता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्यावरही आईवडील चिकाटीनं सतत प्रयत्न करीत राहिले. ती नुसती उभी राहिली नाही; तर धावू लागली, नाचू लागली. मात्र ती कर्णबधिर झाली. अगदी साध्यासाध्या गोष्टींमध्ये या मुलांची कुचंबणा होते. मुख्य म्हणजे अशा व्यक्तींचा सभोवतालच्या जगाशी संपर्क तुटतो. स्वतःच्या भावनाही व्यक्त करता येत नाहीत.
परिसरातील आवाज, शब्द सतत कानावर पडल्यावर त्यातून इतर मुलांचे सहज-शिक्षण होत जाते. पण मूकबधिर मुलांना अभ्यास शिकवणं महाकठीण. पाच-पाच, सहा-सहा तास अभ्यास करूनही अशा मुलांचे आकलन फार थोडे होते आणि लक्षात तर त्याहूनही कमी राहते.
अशा मुलांच्या शाळा, स्पीच थेरपी शिकवणारे शिक्षक फक्त पुण्यात होते.
पुण्यात नोकरी द्यायची नाही, गुणवत्तेनुसार पद द्यायचे नाही असा संस्थाचालकांचा हेका. यातून या कुटुंबाची खूप ससेहोलपट झाली. पण दोघेही हरले नाहीत, थांबले नाहीत. यातूनच प्रेरणा बारावी झाली. सुदैवाने शुमिता चटर्जी नावाच्या नृत्यशिक्षिका प्रेरणाला भेटल्या आणि तिथून प्रेरणाच्या जीवनाला कलाटणी मिळते.
अनेक संकटं, अपयश, दुःखद अनुभव यांच्यावर मात करीत प्रेरणा व तिचे आईबाबा पुढेपुढे जात राहतात. प्रेरणा नृत्यप्रवीण होते. या साऱ्यातून त्यांचे पती केशव यांच्या आग्रहामुळे उज्ज्वलाताई आपले शिक्षण पुढे चालू ठेवतात व पीएचडी होतात. दोघे मिळून स्वतःचे घर बांधतात. जिथे जातील तिथे माणसं जोडतात. पुढे सासर-माहेरचेही लोक त्यांना आपलं मानतात.
डॉ. उज्ज्वला सहाणे यांचे व्यक्तिमत्त्व रसिक, धीट, जबरदस्त आशावादी असल्याचे या पुस्तकातून जाणवते. केवळ स्वतःच्या कर्णबधिर मुलीचे आयुष्य उभे करून त्या थांबत नाहीत. अशी मुलं असलेली घरं शोधून त्यांच्या पालकांना जागृत करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. या प्रवासात त्यांना अनेक सुहृद भेटले. त्यांची व्यक्तिचित्रं छान रेखाटली आहेत.
आज प्रेरणा हिला राष्ट्रीय पुरस्कार व अनेक मानसन्मान मिळाले आहेत. सहाणे यांनाही त्यांच्या अथक संघर्षाला दाद देणारे पुरस्कार मिळालेत. “प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स" या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. रसरशीत शैलीतले हे पुस्तक उज्ज्वला सहाणे यांनी स्वतः प्रकाशित केले असून त्याची आता तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.
आज जन्म दिनाचे औचित्य साधून उज्ज्वला ताईंना" सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" च्या दोन्ही ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो.
"तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार"
"किर्तीवंत व्हा, यशवंत व्हा, यशस्वी भव".
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
27 सप्टेंबर 2022.
🙏🎂🌹🌹🎂🙏
Comments
Post a Comment