*पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल.*भाग 1 ... साहेबराव माने. पुणे. 9028261973.
*पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल.*
भाग 1
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
26 सप्टेंबर 2022.
*प्रस्तावना*
(खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व माहिती आॅनलाईन ब्लॉग च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.)
========================
लग्नाच्या सर्व काही गोष्टी जुळतात. फक्त पौरोहित्य करणारे गुरुजी म्हणतात की पत्रिका जुळत नाही. गुण जुळत नाहीत. एकनाड येते. खडाष्टक योग आहे. मृत्युयोग आहे. राहू, केतू, (खरं तर राहू आणि केतू हे जगात कुठेही नाहीत) मंगळ, गुरु, शनी, आहे. वगैरे वगैरे वगैरे... कारणमीमांसा दिली जाते. त्यामुळे सर्व गुण संपन्न असूनही वधुवरांच्या पालकांकडून लग्न करण्यासाठी एकमेकांना नकार दिला जातो. याबाबतीत आपल्याच ग्रुप मधील बहूतेकजणांची मानसिकता सुधारण्याची आवश्यकता आहे. म्हणून गुरुजींचे (पौराहित्य करणारे) काळेबेरे एकदा लोकांना माहीत करुन देण्यासाठी आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांचा वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांचे या बाबतीत प्रबोधन होणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने इस्लामपूर येथील खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. नितीन शिंदे लिखीत पुस्तकातून संकलन करुन वधुवरांच्या पालकांचे आणि विशेष करून मुलींच्या पालकाचे प्रबोधन करण्यासाठी (खरं तर डोळे उघडण्यासाठी) अपलोड करण्याचा विचार केला आहे.
निदान त्या पोस्ट च्या निमित्ताने का होईना पालकांची मानसिकता बदलण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल असे वाटते.
उद्देश एवढाच आहे की, वधु वर संशोधन करताना शाहू, फुले आणि आंबेडकरांचा वारसा पुढे चालावा आणि अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे जेणेकरून लग्न संस्था टिकेल आणि वेगळ्या पद्धतीने पुढे वाटचाल करु शकेल.
हल्ली मुलामुलींची लग्न करताना त्यांची पत्रिका जुळवून लग्न करण्याची प्रथा पडू लागली आहे. खरं तर ही प्रथा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार केला तर अनिष्ट आणि चूकीची प्रथा आहे. आणि तेच समजून घेण्यासाठी आपल्या ग्रुप साठी आजपासून *पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल* ही लेखमाला अपलोड केली जाणार आहे.
ही लेखमाला वाचा आणि इतरांना जरुर फाॅरवर्ड सुद्धा करा, जेणेकरून यापुढे लग्न कार्यात पत्रिका जुळवण्याची अनिष्ट प्रथा बंद पडेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार होईल.
*लग्नाची पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल*
या गोष्टी लोकांनी समजून घ्यायला हव्यात. आपण सर्व जण वैज्ञानिक युगात वावरत आहोत याचे भान असु द्यावे.
*त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला नक्कीच डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे.*
*शेवटी पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे पत्रिका पाहाणे कितपत योग्य आहे? याचा एकदा सोक्षमोक्ष लावायलाच हवा.*
... साहेबराव माने,
पुणे. 9028261973
Comments
Post a Comment