"ओळख हिरकणी ची"1 सप्टेंबर."सौ. करुणा ताई ढापरे. वाढदिवसाचे औचित्य साधून...
"ओळख हिरकणी ची - 1 सप्टेंबर."
"सौ. करुणा ताई ढापरे."
वाढदिवसाचे औचित्य साधून...
💐🎂🌹
"सत्यम् शिवम् सुंदरम्"
आणि
"महाराष्ट्राचा चांगुलपणा"
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
1 सप्टेंबर 2022.
" सौ. करुणा ताई ढापरे" ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या" सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.
ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
करुणा ताई एम. ए., बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स महाराष्ट्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून ३५ वर्षे ग्रंथपाल या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत.
खरं तर उखाणे असणारा एक लेख मला वाचायला मिळाला होता. त्या लेखाच्या लेखिकेला "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे म्हणून मी फोन केला आणि त्यांनी सांगितले की मला वेळ नसतो तेंव्हा माझ्या आईला तुम्ही सहभागी करून घ्यावे. त्यांच्या मुलीकडून मला करुणा ताईंचा फोन नंबर मिळाला. नंतर फोनाफोनी झाली आणि एक सिद्धहस्त लेखिका आणि साहित्यिका च्या रुपात तीन वर्षापासून करुणा ताई आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी म्हणून सहभागी आहेत.
खरं तर करुणा ताईंची लेखन सामुग्री अफाट आहे. त्यांनी लिहलेली अनेक पुस्तके प्रकाशित /प्रसिद्ध झाली आहेत. अधुन मधुन कधी तरी आमची फोनाफोनी सुरु असते.
करुणा ताईंची मला माहीत असलेली साहित्य संपदा. 👇
में. प्रसिद्ध मनोरमा प्रकाशनाने करुणा ताईंची एकूण १२ पुस्तके प्रकाशित केली, त्याच्या आवृत्त्या प्रकाशित होत असतात. सध्याही लेखन चालू आहे.
गायनाची आवड : गाणे ऐकणे व गाणे यांची त्यांना विशेष आवड आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या गायनाच्या 3 परिक्षा पास झाल्या आहेत.
सध्या त्या सुगम संगीत शिकत आहेत. द्वितीय परीक्षा आत्ताच विशेष प्रविण्यासह पास झाल्या असून करुणा ताईंनी दूरदर्शनवर काही कार्यक्रम केले आहेत.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांच्यातर्फे विवेकानंदांच्या गोष्टी या पुस्तकासाठी बालकथासंग्रह पुरस्कार प्रदान झाला. सूत्रसंचालन संचालक म्हणून बरेच कार्यक्रम केले. शब्दपटकार वर्तमानपत्रातून तसेच मासिकांतून अनेक शब्दकोडी प्रकाशित झाली आहेत.
पुस्तकाचा जन्म...
"निवडा आपला डाॅक्टर"
लेखन - सौ. करुणा ताई ढापरे.
प्रत्येक मनुष्यप्राणी हा केव्हा ना केव्हा तरी आजारी पडतोच. साध्या दुखण्यापासून ते मोठ्या दुखण्या पर्यंतच्या कोणत्याही आजाराने रोगग्रस्त होतो. अशा वेळी आसपास सल्ले देणारे खूप असतात. हे सल्ले ते त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे देत असतात. एक जण असे करा असे म्हणतो, तर दुसरा असे अजिबात करू नका असे म्हणतो. या सल्लागारांच्या नादी न लागता, योग्य त्या तज्ञांकडून तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच त्या त्या तज्ञांकडून औषधोपचार करून घेतले तर आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो.
मध्यमवर्गीय तसेच उच्चवर्णीय लोकांचे शिक्षण झालेले असल्याने, तसेच आर्थिक ऐपत असल्याने ते लोक लगेचच त्या त्या रोगाच्या तज्ञांकडे जातात व स्वतःला लवकर बरे करून घेतात. परंतु सर्वसामान्य जनतेत असे होत नाही. साधारण जनतेमध्ये त्यांना होणाऱ्या रोगांविषयी काहीच माहिती असत नाही. तसेच जे रोग झाले असता नक्की कोणत्या प्रकारच्या डॉक्टरकडे जावे हे त्यांना कळत नाही. कारण स्पेशलायझेशन च्या डॉक्टरांच्या पाट्या या इंग्रजीत असतात. तसेच त्या डॉक्टरांची त्या रोगाच्या अनुषंगाची पदवीही इंग्रजीत लिहिलेली असते. एखाद्या रोगाची लक्षणे दिसून येत असली तरी ते सर्वसामान्य जनतेला कळत नाही. पर्यायाने डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो तसेच शिक्षणाचा अभाव असल्याने कोणत्या तज्ञ डॉक्टरांकडे जावे हे त्यांना कळत नाही.
अशा वेळी प्रत्येक दवाखान्याच्या बाहेर डॉक्टरांची नावाची पाटी, पदव्यांची पाटी तसेच त्यांच्या विशेष विषयाची पाटी, ही मोठ्या अक्षरात मराठीतच असायला हवी. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना समजून, ते त्या दवाखान्यात येतील.
तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर सर्वसामान्यांची सेवा करू शकतील. वरील परिस्थिती लक्षात घेऊन या विषयावरील एखादे पुस्तक मराठीत लिहिले तर सर्वसामान्यांना याचा नक्कीच उपयोग होईल असे वाटले. एखाद्या आजारावरील काही लक्षणे आपल्यात दिसली, तर नक्की आपल्याला काय आजार झाले आहे हे त्यांना सदर पुस्तक वाचून समजेल. तसेच तशी लक्षणे दिसली तर नक्की कोणत्या तज्ञ डॉक्टरांकडे जावे हे त्यांना कळेल.
... सौ. करुणा ताई ढापरे.
👉करुणा ताईंनी लिहिलेली पुस्तके...अर्थात मला माहीत असलेली.
1) लेडीज स्पेशल.
2) हिंदू सणवार आणि रांगोळी.
3) जागतिक किर्तीचे 101 समाजसुधारक.
4) 75 गोष्टी स्वामी विवेकानंदांच्या.
4)राष्ट्रीय व धार्मिक सण-उत्सव.
5) जरा डोकं चालवा.
6) दक्षिणेतील बिरबल अर्थात तेलानीरामाच्या गोष्टी.
7) अन्नपूर्णेची थाळी.
8) सूत्रसंचालन.
9) निवडा आपला डाॅक्टर.
... आणि इतर.
सोबत काही पुस्तकांची छायाचित्रे दिली आहेत.
👉"निवडा आपला डाॅक्टर" या पुस्तकासाठी डॉ. हेमंत जोशी (MD. डी. सई. एच्. बालरोगतज्ज्ञ ) यांनी प्रास्तावना लिहीलेल्या पानाचे छायाचित्रं देत आहे.
करुणा ताई 🙏
तुमची लेखनी अशीच तळपत राहो हीच खऱ्या अर्थाने "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप च्या वतीने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे.
"जिवेत् शरद् शतम्"
💐🌹🎂
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
1 सप्टेंबर 2022.
Comments
Post a Comment