*अनाथ, वृध्दांसाठी "आपलं घर" : कर्मवीर विजय फळणीकर.* *महाराष्ट्राचा चांगुलपणा. *संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973.18 जुलै 2022.

*अनाथ, वृध्दांसाठी "आपलं घर" : कर्मवीर विजय फळणीकर.*

*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
*साभार - 👉मृदुला जोशी पुरंदरे. ग्लोबल मराठी व्हिलेज कट्टा. अमेरिकेहून.*
(मृदुला ताई जोशी पुरंदरे ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. 14 मार्च 2021 रोजी मृदुला ताई जोशी पुरंदरे यांनी सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये या पोस्ट ची लिंक दिली आहे. त्याचाच वापर करून ही सविस्तर पोस्ट "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी अपलोड करत आहे. कधीतरी वेळात वेळ काढून पुण्यातील वारजे माळवाडी आणि डोणजे येथील "आपलं घर" ला नक्की भेट द्या. तुमची तिथे कुणीतरी वाट पहात आहे. तुमच्या कडून मायेची सावली मिळेल या आशेने. आणखी एक गोष्ट... या पोस्ट मधील video नक्की पहा.) 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973.

18 जुलै 2022. 

मुलाच्या अकाली निधनानंतर फळणीकर दाम्पत्य जीवन संपवायला निघाले होते. तेच आता म्हणतात ईश्वरा मला शंभर वर्षे काम करू दे बरं का ? निराधार, अनाथ आणि वृध्दांसाठी बांधलं " आपलं घर "
श्री विजय फळणीकर, संचालक अध्यक्ष आपलं घर, यांचा झपाटून टाकणारा प्रवास त्यांच्याच शब्दात..
.. मृदुला जोशी पुरंदरे.
E TV मराठी आणि Z 24 TASS च्या वृत्तनिवेदिका. 

https://youtu.be/5eRzjhZkg9M?sub_confirmation=1

कृपया वेळात वेळ काढून ही मुलाखत जरुर पहा. आणि ही पोस्ट शक्य तितक्या लोकांना फाॅरवर्ड सुद्धा करा. 🙏
*... मृदुला जोशी पुरंदरे. अमेरिका.*

विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये अनंक आजी-आजोबा आणि मुलं राहतात. अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी..
‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की 
वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला आणि मुलाखतीची वेळ ठरवली.
विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते. 
 समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत.
उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com

 फळणीकरांनी आपल्या मित्रांजवळ संस्थेचा विचार बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.

फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय.

चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो. इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’

या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत.

हसत हसत फळणीकर म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी.

https://youtu.be/LCOntLf12is

*☝️भिक्षा मागून कचऱ्यातून जेवण उचलून पोट भरायचो.*
... विजय फळणीकर. 
"आपलं घर"

आपलं घर- मदत करायची असल्यास संपर्क करा.
www.apalaghar.com
apalaghar@yahoo.com

संपर्क करण्यासाठी, आणि आर्थिक मदत करण्यासाठी सविस्तर माहिती... 👇

Apala Ghar NGO - Contact
Name of the NGO: Apla Ghar

Managed By: Late Vaibhav Phalnikar Memorial Foundation.

Address: Behind Atul nagar, Mumbai-Banglore Highway,

Warje Malwadi.Pune-411058 (India)

Contact Person: Vijay Phalnikar (Founder/President)

Contact no: +919850227077

Email: apalaghar@yahoo.com

Bank: Cosmos Co.Operative Bank Ltd, Warje Branch.Pune.

A/c.no.: 032204201220095

IFSC Code: COSB0000032

Branch code: 032

Vijay Phalnikar

Behind Atul Nagar,

GokulNagar, Varanashi Society,

Mumbai-Banglore Highway,

Warje Malwadi,

Pune – 411058

Ph: 91-020-20250739

Vijay Phalnikar

Near Siddhanath Forest Aashram,

Donje (Golewadi),

Sinhagad Foothills,

Pune – 411042

Ph: 9922182989

*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
18 जुलै 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.