*ओळख हिरकणी ची - 27 जुलै**रुपाली ताई पाटिल. (सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप) कुची : वाढदिवसाचे औचित्य साधून.*💐🌹🎂

*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
*ओळख हिरकणी ची - 27 जुलै*
*रुपाली ताई पाटिल. (सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप) कुची : वाढदिवसाचे औचित्य साधून.*
💐🌹🎂
*पाणी फौंडेशन च्या माध्यमातून केलेले काम. 👇*

http://bit.ly/2pvfeQQ

*☝️ तालुक्यातील कुची गावातील तीन महिलांनी (रुपाली ताई पाटिल, निता ताई पाटिल, तत्कालिन सरपंच वैशाली ताई पाटिल आणि सोबत एकाकी झुंजणारा आवलिया - प्रमोद माळी) पाणी फौंडेशन च्या माध्यमातून केलेले काम.*

*सौ. रुपाली ताई पाटिल* ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या *सत्यम् शिवम् सुंदरम्* ग्रुप क्रमांक 1 च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. आणि त्या माझ्याच गावातील आहेत. गावात परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कूल ची स्थापना केली आहे. स्वतः त्या साठी अपार कष्ट घेतले आहेत. 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com

कवठेमहांकाळ तालुका हा कायमस्वरुपी अवर्षण/ दुष्काळी भागात मोडतो. साधारणपणे चार वर्षापूर्वी कुची गावात आमिर खान संचालीत पाणी फौंडेशन कार्यक्रम राबवण्यात यावा म्हणून *सरपंच, वैशाली पाटील, रुपाली ताई पाटिल, निता पाटील आणि प्रमोद माळी* यांनी पुढाकार घेऊन पाणी फौंडेशन च्या माध्यमातून गावात काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला फक्त 30 लोकांचा प्रतिसाद मिळाला. एक वेळ अशी आली की हे चौघेच शिल्लक राहिले. पण जिद्द आणि महत्त्वाकांक्षा सोडली नाही. शेवटी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आणि आनंदाला पारावार उरला नाही. पाणी फौंडेशन करता काम करत असताना एक video तयार करण्यात आला होता. तो Video आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् च्या दोन्ही ग्रुप आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुप मध्ये अपलोड करत आहे.
शक्य झाल्यास तुमचा audio bite घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या साठी वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला फोन केला जाईल.
आपल्या गावात पाणी फौंडेशन साठी केलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळाली आहेच. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कूल च्या माध्यमातून योगदान देत आहात. ही कौतुकास्पद बाब आहे.
तुमच्या भावी कार्यासाठी सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप च्या वतीने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे. 💐🌹🎂

या निमित्ताने आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की *प्रमोद माळी, कुची. ता. कवठेमहांकाळ.* यांनी या कामासाठी विशेष करून पुढे होऊन उत्तेजन दिले आहे. गावातील नागरिकांची अगदी नगण्य साथ असताना हार न मानता हा आवलिया एकाकी झुंज देत राहिला. त्यांनी धीर देऊन कामात सातत्य राखले आणि पाणी फौंडेशन ची गाथा यशस्वी करुन दाखवली. त्या साठी *प्रमोद माळी. कुची. ता. कवठेमहांकाळ. जिल्हा. सांगली* यांचे सुद्धा महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून अभिनंदन. 💐🥇
जाता जाता तत्कालीन सरपंच *वैशाली पाटिल* यांचाही नामोल्लेख टाळून चालणार नाही. त्यांचही अभिनंदन. 🌹🥇. 
*नीता पाटील* यांना तर भावनांचा आवेग आवरता आला नाही. इतक्या त्या भावनाविवश झाल्या. शेवटी त्यांनाही आनंदाची भरती आलेली दिसली. त्यांचही अभिनंदन. 💐🥇

माझ्या गावासाठी झटणाऱ्या सर्वांचेच आभार.🙏 अभिनंदन.🌹 

... साहेबराव माने. पुणे. 
सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप. 
9028261973.
27 जुलै 2022. 

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.