*ओळख अनमोल हिऱ्याची.**डॉ. अभिजीत सोनवणे - @doctorforbeggars*जन्म दिनाचे औचित्य. 17 एप्रिल. *महाराष्ट्राचा चांगुलपणा.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 17 एप्रिल 2022.
*ओळख अनमोल हिऱ्याची.*
17 एप्रिल.
*डॉ. अभिजीत सोनवणे @doctorforbeggars.*
जन्म दिनाचे औचित्य साधून.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
17 एप्रिल 2022.
आतापर्यंत ओळख हिरकणी ची अंतर्गत मी मला वाचनाच्या आवडीतूनआणि Social media च्या माध्यमातून भेटलेल्या आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये सहभागी असलेल्या 100 पेक्षा जास्त हिरकणी भगिनींच्या ओळखी मी महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुप च्या माध्यमातून करुन दिलेल्या आहेत.
आज एका हिऱ्याची ओळख करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. ते आहेत *"डॉ. अभिजीत सोनवणे - @doctorforbeggars.*
खरं तर त्यांची ओळख करून देणे म्हणजे सुर्याला मेणबत्ती दाखवल्या सारखे आहे. त्यांचे ब्लॉग वेळोवेळी आपण महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुप मध्ये आणि फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् च्या दोन्ही ग्रुप मध्ये अपलोड करत आलो आहोत.
त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घ्यावा आणि कुठे तरी तुमच्या पर्यंत माहिती पोहचावी ह्या उद्देशाने जानेवारी 2022 मध्ये *"भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर - अर्थात डॉक्टर फाॅर बेगर्स..एक प्रवास"* हे त्यांच्या ब्लॉगवर आधारित पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी स्वतः लिहीलेले ब्लॉग यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या पुस्तकासाठी आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या जळगाव च्या सन्मानिय भगिनी सदस्या "मोनाली ताई पाटिल" यांचे संकलन लाभले आहेत.
🙏डॉ. अभिजीत सोनवणे सर् 🙏
... महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि इतर 26 ग्रुप कडून तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सर्व सदस्यांच्या वतीने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो.
तुमची ओळख मी काय देणार. इथे वाचणारा प्रत्येक जण तुम्हाला ओळखत आहे. अगदी देवाला ओळखतात तसं.
गेल्या दोन वर्षांत आम्ही मंदिरातले खरे देव पाहिले जे मंदिरांच्या मध्ये कडीकुलूपांच्या आत बंदिस्त होते. पण तुम्ही आणि सौ. मनिषा ताईंनी मात्र अगदी विठ्ठल रखुमाई सारखे दीनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.
गेल्या दोन वर्षांत जगभरात कोरोनाच्या संकटामुळे काही लाख जीवाला मुकले. पण इतक्या मोठ्या कोरोनाच्या साथीला पुण्यातील एका भिक्षेकऱ्याने सुद्धा भिक घातली नाही. अर्थात त्या पाठीमागचे खरे हिरो तुम्ही डॉ अभिजीत सोनवणे - @doctorforbeggars आहात.
खरं तर प्रत्येकाला शुभेच्छा देताना संबधीताच्या च्या कार्याला भरभराटीचे दिवस येवो म्हणून शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. पण इथे मात्र शुभेच्छा देताना तुमचं अतुलनीय कार्य लवकर बंद होऊ दे अशी प्रार्थना करतो. सर्व भिक्षेकरी कष्टकरी आणि गावकरी होऊ देत.
पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.
🌹💐🎂🎂💐🌹
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
17 एप्रिल 2022.
Comments
Post a Comment