*निसर्गात ढवळाढवळ न करता सर्वांनीच मांसाहार टाळला पाहिजे.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - किरणकुमार आवारे, शिरवाडे. 27 मार्च 2022.
*निसर्गात ढवळाढवळ न करता सर्वांनीच मांसाहार टाळला पाहिजे.*
*हा लेख वाचल्यानंतर एका व्यक्तीने जरी मांसाहार सोडला तरी लेख लिहीण्याचा उद्देश सफल झाला असे मी समजेन.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - किरणकुमार आवारे, शिरवाडे.
27 मार्च 2022.
एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी कशासाठी मारले जातात याची उत्तरं दोन आहेत एक तर खाण्यासाठी पशूंचा वापर होतो आणि दुसरे सौंदर्यप्रसाधने, औषधे तयार करण्यासाठी. आपल्याला ऐकून खरोखरच आश्चर्य वाटेल पण आज बाजारात असलेली अनेक सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी किंवा त्यांची परीक्षा चाचणी घेण्यासाठी प्राण्यांचा छळ आणि हत्या करतात, अशा वस्तूमध्ये अंडी किंवा तत्सम पदार्थ वापरलेले असतात. अशा पद्धतीने प्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवाचा वापर करून तयार केलेली प्रसाधने लोक खुलेआम वापरतात. साबणाच्या सुवासिकतेमागे, जाहिरात करण्यामागे प्राण्यांची हत्या लपलेली आहे हे उत्पादक आपल्या लक्षात सुद्धा येऊ देत नाही. फर किंवा मुद्र लोमाची टोपी अनेक लोक वापरतात पण किती जणांना माहित असत की ही फर आईंच्या गर्भातून बळजबरीने बाहेर काढलेल्या कोकराच्या कातड्याची आहे. काही प्रसिद्ध कंपन्यांची बूट किंवा चपलाही अशाच पिल्लांच्या कातड्या पासून बनवलेल्या असतात.
याशिवाय माणसाच्या खाण्यात दरवर्षी अगणित प्राणी सरांस मारले जातात. दरवर्षी अधिकृत कसलखान्यात सुमारे २० लाख जनावर मारले जातात असे माजी शेती मंत्री सरदार बुटासिंग यांनी संसदेत सांगितलं होतं. हा भरमसाठ आकडा केवळ अधिकृत कत्तल खाण्यातला आहे. याशिवाय खेडोपाडी पसरलेल्या हजारो अनधिकृत कत्तलखाने, देवापुढे दिले जाणारे बळी, घराघरात, हॉटेलातून मारले जाणारे प्राणी वेगळेच. अधिकृत कत्तलखान्यांची संख्याही प्रचंड आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात जेमतेम तीनशे कत्तलखाने होते आता त्यांची अधिकृत संख्या लाखात आहे. अनेकदा गाड्यांमध्ये भरून प्राणी नेले जातात. या गाड्यामध्ये प्राणी इतके कोंबून भरलेले असतात की श्वास न घेता आल्याने खालचे प्राणी तडफडून मरतात तर बाकीचे अर्धमेले होतात. अत्यंत बारीक जाळ्यांचे पिंजरे या गाड्यांना बसवलेले असतात त्रासदायक अवस्थेत प्राण्यांचे दूसरे काय होणार? हे प्राणी कत्तलखान्यात पोहोचतात तेव्हा दुसरे यापेक्षाही भयंकर संकट त्यांच्यापुढे उभे असते. कत्तलखान्यात फक्त जिवंत प्राणी घेतले जातात. त्यासाठी त्यांच्या जिवंतपणाची टेस्ट घेतात. *हे अर्धमेले प्राणी जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकतात या वेदना सहन न होऊन जेव्हा तो प्राणी जीवाच्या आकांताने तडफड करतो तेव्हा प्राणी जिवंत असल्याची खात्री होते, तेव्हाच त्याला पुढच्या मरणासाठी कत्तलखान्यात घेतलं जातं. यानंतर माणसांचे उर्वरित काम सोपं व्हावे यादृष्टीने प्राण्यांचा विविध पद्धतीने जनन्वित छळ केला जातो. प्राणी मरण्या आधी त्याची कातडी अखंड निघून यावी यासाठी त्याच्या अंगावर २८० अंश सेल्सिअस उकळत्या ऍसिड मिश्रीत पाण्याचे फवारे मारले जातात. भीतीने अर्धमेल्या झालेल्या आणि तडफडणाऱ्या प्राण्याचा एक पाय बांधून उलट्या अवस्थेत त्यांची मानेंची नस तोडली जाते. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात त्यांच्या शरीरातून रक्त वाहत असते हे रक्त खाली ठेवलेल्या भांड्यात गोळा होत असतं, हे रक्त पुढे औषध कंपन्यांना विकले जाते. त्यातून ट्रॉनिक्स व इतर औषधी तयार होतात. अनेक टॉनिक्स मध्ये प्राण्यांच्या रक्ताचा अंश असतो. हे कित्येकांना माहित पण नसतं.* प्राण्याला टांगलेल्या अवस्थेत त्यांचं पोट फाडून त्यात हवा भरतात, त्यांची कातडी सुलभतेने निघावी यासाठी हे करतात अशा प्रकारे हाल हाल केलेला तो प्राणी मरणपंथाला लागतो. या प्राण्याला मृत्यू यायला दोन तीन तास लागतात प्राणी मेल्यानंतर त्याचे तुकडे करून हाडे, मांस, कातडी वेगळी केली जाते. यातील मांस मग विक्रीला ठेवतात क्लोरटेट्रासायक्लीन, डॉक्सिसायक्लीन, इन्ड्रोफ त्यातून मटन, चिकन खिमा असे चविष्ट व रुचकर लोक्सिन, सिप्रोफ्लोक्सिन, न्यूयोमायसीन, अमिनो पदार्थ स्वयंपाक घरातून तयार होतात, त्यावर प्लायकोसाइड्स या अँटिबायोटिक्सला who ने लोक तुटून पडतात. प्राण्यांना पकडून त्यांना कत्तलखान्यात ढकलणे व असहाय प्राण्यांना छळ करून मारणे आणि त्यांचे मांस विविध मसाले घालून खाणं हा सारा मानवतेवरचा कलंक आहे. ज्या पौष्टीक आहारासाठी मांसाहार केला जातो तो मांसाहार तरी योग्य उपकारक आहे का ? याचे उत्तर पूर्णपणे नकारार्थी आहे. कोलेस्टेरॉल हा रक्तातील स्निग्ध आम्लबरोबर संयुक्तपणे असणारा महत्त्वाचा घटक. थोड्याफार प्रमाणात कोलेस्टेरॉल शरीराला आवश्यक आहे मात्र त्याचा प्रमाण वाढलं तर ते अत्यंत घातक ठरतं मांस, अंडी व इतर प्राणीजन्य पदार्थ यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण भरपूर असतं हे पदार्थ खाल्ल्यामुळे रासायनिक किंवा चेताग्रहाच्या रिसेप्टर संख्येत घट होते. यामुळे रक्तप्रवाहात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं यामुळे हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, खडे होतात. हृदयविकृती व उच्च रक्तदाब है विकार रक्तवाहिन्यांच्या आत कोलेस्टेरॉल साठुन होतात. अंड्यात सर्वात जास्त कॉलेस्टेरॉल असतात. १०० ग्रॅम अंडी खाण्यात आली तर शरीराच्या गरजेपेक्षा सुमारे अडीचपट कोलेस्टेरॉल शरीरात जातो. फेफर येणं, आंत्रपुच्छचा विकार, मलाशयाचा कर्करोग असे रोग मांसाहार करणाऱ्याला होण्याची जास्त शक्यता असते. मांसाहारातून प्रमाणाबाहेर प्रथिने पोटात जातात त्यामुळे मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. मांसजना पदार्थामुळे रक्तातील युरिक आम्लाचे प्रमाण वाढतं. आम्ल सांध्यावर साठू लागतो त्यामुळे संधिवाता सारखे रोग होतात. मांसाहार केल्याने धमन्यांचा अंतर्भाग चोंदती, अतिसार, अपचनाचा त्रास सुरू होतो आणि आतडी कुजायला सुरवात होते. कर्करोगाचं प्रमाण ही मांसाहारी व्यक्तीमध्ये जास्त असतं. मांसाहारामुळे रक्तप्रवाहातील विषद्रव्यांच्या विरुद्ध लढा देण्याच्या किंवा प्रतिकार करण्याच्या क्षमतेत घट होते त्यामुळे किरकोळ आजारापासून रक्षण करण्यास शरीर असमर्थ ठरते. मांसजन्य पदार्थात 'अ' जीवनसत्व असतं त्यामुळे सतत मांसाहार करणाऱ्यांना त्वचारोग होतात, डोकेदुखी, अर्धशिशी महिलांना मासिक पाळीचा अति त्रास मांसाहारामुळे होतो. मांसाहार करण्यातून आणखी एक भयानक धोका उद्भभवतो तो प्राण्यांची झालेल्या रोगाचा प्राणी, मासे, पक्षी यांना तसेच अंड्यामध्येही काही मूळचे रोग असतात. खाण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जात नाही, यामुळे हे रोग मांस खाणान्यांच्या पोटात जातात. रोगकारक विषाणू व जिवाणू यांना सहज शहरात प्रवेश मिळतो. काही प्राणी निरोगी असले तरी कत्तलखान्यात भीतीने व धक्क्याने थरथर कापत असतात. आपलं मरण त्यांना कळून चुकलेलं असतं. त्यामुळे ते एक-दोन दिवस अन्नपाणीही घेत नाहीत. भीती व बेचैनी यामुळे शौच आपोआप पाझरू लागतो. हा मल रक्तात मिसळतो व रक्त विषारी व अपायकारक बनते त्यामुळे मांसही प्रदूषित बनतं. कत्तल होण्यापूर्वी निराधार प्राणी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अतिशय क्रोथ, प्रचंड भीतीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. यामुळे एनलिन हे संप्रेरक तयार होऊन रक्तात मिसळले जाते. त्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्त प्रदूषित होऊन माणसात पसरते, यातून अत्यंत घातक दुष्परिणाम होऊन रोग होतात. मांसाप्रमाणे अंड्यातही अनेक दोष असतात, अंडे शाकाहारी आहे असे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. अंड्याला देखील प्राणवायूची गरज असते. कवचावरील १५ च्या आसपास छिद्रातून ते श्वासोच्छ्वास करत असतं. या अफलीत अंड्यावर काही प्रक्रिया करून कोंबडीचे पिल्लू तयार करता येते. या प्रक्रियेला पार्थिनोजनेसीस म्हटलं जातं या प्रक्रियेचं शास्त्रीय वर्णन डॉ.एच.जी.वेल्स यांनी सायन्स अँड लाईफ यापुस्तकात केलं आहे. अफलीत अंड्यातही जिवंत स्त्रीबीज असतं. त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणं चूक आहे. अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञ रैम्पकिन्स क्रीस्तोर यांच्या 'द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉटस' या पुस्तकात काढला आहे. त्यामुळे अंडी शाकाहारी नाही हे तर सिद्ध झालंच आहे. शिवाय कोंबड्यांनी जास्त अंडी द्यावी यासाठी त्यांना सतत दबावाखाली व अस्वच्छ पद्धतीने पाळलं जातं. संप्रेरक व इंजेक्शन्सचा अतिरेक केला जातो. कोंबड्यांनी अंडी घातल्याबरोबर ती उबवन करणाच्या यंत्रात ठेवली जाते या पद्धतीचा वापर करून २१ दिवसांऐवजी अवघ्या १२ दिवसातच अंड्यातून पिल्लू बाहेर येते. त्यातील मादी पिल्ले बाजूला काढून त्यांना विशेष आहार दिला जातो. त्या लवकर मोठया व्हाव्यात म्हनून त्यांना रात्रंदिवस जागं ठेवलं जातं, रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाश चालू ठेऊन त्यांना झोपू दिले जात नाही. असल्या प्रकाराने त्या लवकर अंडी द्यायला सुरुवात करतात. कोंबडीला अशा प्रकाराने त्रास देऊन अंडी मिळत असतील तर त्यांना शाकाहारी का म्हणावे. भारतीय विज्ञापन मापक परिषद (Advertising स्टैंडर्डस कऊन्सिल ऑफ इंडिया) यांच्या २६ मे १९९० च्या निर्णयानुसार अंडी ही भाजी नाही. त्यामुळे अफलीत अंडी शाकाहारी म्हणून विकणं हा सामाजिक गुन्हा आहे असं जाहीर केलं आहे. लहान मुलांना अंडी देऊ नयेत असा सल्ला हापकीन इन्स्टिट्यूटने दिला आहे. कारण यामुळे एलर्जीचे विकार, दमा, सर्दी, पचनाच्या तक्रारी व कातडीचे विकार होतात. प्रत्येक अंड्यात २०० मिलीग्राम कोलेरेस्टॉल असतं. हे प्रमाण अती आहे, त्याचप्रमाणे कोंबड्याना दिली जाणारी हार्मोन्स, डी. डी. टी. अँटिबायोटिक सारख्या विषाचे अंश अंड्यात असतात यामुळे हृदयरोग झालेल्याला मांसाहार न करण्याचा तसेच अंडीही न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ब्रायलर चिकन मुळे हार्मोनल इनबॅलन्स होण्याचे प्रमाण वाढले आहे. ब्रायलर मध्ये ऑटबायोटिकचा वापर आजारापासून वाचण्यासाठी आणि तातडीने वाढ व्हावी यासाठी केला जातो. अँटिबायोटिक वापरात ५ देशात भारताचा पहिला नंबर लागतो. ऑक्सिटेट्रासायक्लीन मानवाकरीता खतरनाक सांगितलं आहे. टेट्रासायक्लीन आणि फ्लोरोफिनोलोन्स ही अटिबायोटिक कॉलरा, मलेरिया, आणि युरिनरी ट्रैक इन्फेक्शन साठी वापरले जातात. प्राण्यांना याचा वापर केल्यास त्यापासून ड्रग्ज रेजिस्टन्स बॅक्टेरियाच्या स्वरूपात ते समोर येतात. डॉक्टरांनी विनाकारण दिलेले अँटिबायोटिक किंवा फार्मिंग चिकनच्या माध्यमातून या बॅक्टेरिया मानवाच्या शरीरात गेल्यास सध्या अस्तित्वात असलेले अँटिबायोटिक कसे काम करतील हाच प्रश्न आहे. ही रेजिस्टन्स आईंच्या पोटातून बालकाच्या शरीरात गेल्याने दरवर्षी भारतात सुमारे ५७ हजार नवजात बालके मृत पावतात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हायरमेंट (CEC) यांनी अभ्यास करून फेब्रुवारी २०१८ ला जो रिपोर्ट जारी केला त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, भारतात चिकन फार्मिंग साठी तब्बल २७०० टन अँटिबायोटिक वापरले जातात ही नक्कीच धक्कादायक बातमी आहे. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझम च्या वेबसाईटवर आलेल्या रिपोर्ट नुसार त्यांनी असा दावा केला आहे की, कोंबड्यांना विविध रोगांपासून वाचण्यासाठी चिकन फार्मिंग मध्ये कोलस्टी अँटिबायोटिकचा पण वापर सुरू आहे. याच्या वापरामुळे कोंबड्याचे वजन वाढते त्यामुळे जास्त नफा मिळतो. मात्र खरी गंभीर परिस्थिती ही आहे की, हे अँटिबायोटिक मानवाला सगळे पर्याय संपल्यानंतर दिले जाते है मानव आणि पर्यावरणसाठी विष मानले जाते. कोलस्टीनला डॉक्टरी भाषेत लास्ट होप अँटिबायोटिक" म्हटले जाते. भारतात १९४० पासून कोंबड्यांना आर्सेनीक दिलं जातं. कमी खाद्य घालूनही वजन व आकार वाढविण्यासाठी आर्सेनिकचा वापर केला जातो. वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ फिशडीज अनिमल सायन्सेस या संशोधक संस्थेने एक संशोधन अहवाल जाहीर केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, चिकन फार्म मध्ये पाळलेल्या कोंबडयांच्या चिकन मध्ये ० ते ७.७ पीपीएम आहे तर अंड्यात याचे प्रमाण ० ते ३.८ पीपीएम आहे. हे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त आहे. हा त्रास फक्त चिकन खाणाऱ्यांनाच नाही तर कोंबडीचे खत शेतात टाकल्यानेही होऊ शकतो. कोंबडी खत शेतात टाकल्यास आर्सेनिक पिकात शोषले जाते. ७० ते ९० टक्के आर्सेनीक पाण्यात विरघळते. त्यामुळे मातीतून ते सहज पिकात शोषले जाते. त्यामुळे ड्रग कंट्रोलर fssci ने त्याची मंजुरी मागे घ्यायला हवी. भारत सोडला तर सगळ्या जगात आर्सेनिक वर बंदी आहे मात्र भारतात त्याचा वारेमाप वापर सुरू आहे. यासाठी जगभराचे डॉक्टर्स व आहारतज्ञ शाकाहाराचा पुरस्कार करतात. शाकाहार हाच मानवी शरीर शास्त्राच्यादृष्टीने योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठात यासंदर्भात संशोधन झालं आहे. दीड ते दोन वर्षाच्या मुलांवर केलेल्या प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की, मुलांना शाकाहारच आवडतो. आजारी असताना विविध प्रकारचे वनस्पती जन्य पदार्थ घेतात. काही टाळतात. शिजवलेल्या आहारापेक्षा कच्चा न शिजवलेला आहारच त्यांना जास्त आवडतो असा निष्कर्ष निघण्याचं कारण आपल्या शरीर रचनेतच आहे. यासाठी मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना शाकाहारी पेक्षा कशी वेगळी आहे याची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल. मांसाहार करणारे मांसाहार करण्याचे खूपच हास्यास्पद समर्थन करतात की, जीव, जीवस्य, जीवनम् म्हणजे सगळे प्राणिमात्र एकमेकांवर अवलंबुन आहेत. असे तर आपल्या धर्मातच आहे. असेलही परंतु त्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी तयार केली आहे त्यात मानव किंवा शाकाहारी ही एक साखळी आणि दुसरी मांसाहारी प्राण्यांची साखळी. आणि मानव मांसाहारी प्राण्यांच्या म्हणजे पशूंच्या साखळीत येतच नाही. मानव हा तर फळे व अन्न धान्य खाणाऱ्या प्राण्यांच्या साखळीत येतो. काही असे बालिश प्रश्न विचारतात की, बोकडांचे करायचे काय ? तर बोकड हा पण मांसाहारी प्राण्यांच्या साखळीत येतो त्यामुळे त्याचे काय करायचे हे वाघ, सिंह बघून घेतील. मांसाहारी प्राण्यांची शरीररचना शाकाहारी पेक्षा कशी वेगळी आहे हे तुलनेने आपल्या लक्षात येईल. मांसाहारी प्राण्यांचे दात टोकदार व लचके तोडणारे असतात. नखे तीक्ष्ण असतात. शाकाहारीचे दात जाड व पसरट असतात. नखे तीक्ष्ण नसतात. मांसाहारीचा जबडा केवळ वर आणि खाली हलतो, ते अन्न चावून न खाता गिळून घेतात. शाकाहारीचा जबडा वर खाली डावी, उजवीकडे हलतो. पुढे मागेही हलतो. मांसाहारी प्राण्यांची जीभ खडबडीत असते. पाणी पितांना ते जीभ बाहेर काढतात. चावून अन्न प्रदार्थ पितात तर शाकाहारीची जीभ जड असते, खडबडीत नसते ते ओठांनी पाणी पितात, जीभ बाहेर काढत नाही. मांसाहारी प्राण्याच्या आतड्याची लांबी कमी असते. ती जवळजवळ त्याच्या शरीराच्या लांबीइतकी असते म्हणूनच ते मांसाहार शरीराबाहेर सहज टाकतात त्यामुळे त्यांच्या शारीरात मांसाहार कुजत नाही त्यातून विषारी द्रव्य निर्माण होत नाही. शाकाहारी प्राण्याच्या आतड्याची लांबी त्याच्या शरीराच्या लांबीच्या चारपट व मणक्याच्या लांबीच्या बारा पट असते त्यामुळे ते मांसाहारी अन्न शरीराच्या बाहेर सहज टाकू शकत नाही, ते अन्न आतड्यात कुजते, त्यातून विषारी द्रव्य बाहेर पडून शरीरात भिनतात. मांसाहारी प्राण्यांचं यकृत आणि मूत्रपिंड शाकाहारी पेक्षा मोठं असतं, त्यामुळे मांसाहारामुळे निर्माण झालेली दूषित द्रव्ये शरीराबाहेर लवकर टाकू शकत नाही. मांसाहारीच्या जठरात शाकाहारी पेक्षा दहापट हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं म्हणून ते सहजगत्या मांसाहार पाचवतात. मांसाहारीच्या लाळेत ऍसिड जास्त तर शाकाहारी मध्ये अल्कली जास्त असते. शाकाहारीच्या लाळेत रायलीन हे द्रव्य असतं ते अन्न पचनाला मदत करते. रक्ताची रासायनिक स्थिती मांसाहरित आम्लतेकडे झुकणारी व शाकाहारीची अल्कलीकडे झुकणारी असते. मांसाहरिचा आवाज भयप्रद, जाडाभरडा तर शाकाहारीचा आवाज कोमल असतो. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या डॉ. अॅलन ऑकर यांनी दातावरील प्रदीर्घ संशोधनंतर असा निष्कर्ष काढला की, मानव हा फळे खाणाऱ्या प्राण्यांचा वंशज आहे. यामुळे शाकाहार हाच मानवाचा नैसर्गिक आहार आहे. इतर शाकाहारी प्राण्यांना आपण शाकाहारीच आहोत हे कळतं. जसं माकडाला कित्येक दिवस उपाशी ठेवलं तरी ते मांसाला शिवत नाही असं प्रयोगातून सिद्ध झालं आहे. सिंह कधीच गवत खात नाही. शेळी, गाय कधीच मांस खात नाही. माणूसच काय तो असा प्राणी आहे की ज्याला आपण शाकाहारी आहोत हे वास्तव टाळायचं आहे. अजूनही माणसाने नैसर्गिकरीत्या योग्य असा शाकाहारच घेतला तर तो कित्येक रोगांना दूर ठेवू शकेल. काही मांसाहारी असा युक्तिवाद करतात की सर्वांनीच जर शाकाहारी व्हायचं ठरवलं तर जगातीलअन्नधान्य संपून जाईल. हा अत्यंत खोटा प्रचार आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी न्युयार्क मध्ये विकसनशील देशांची अन्नसमस्या यावर बोलताना म्हटलं होतं की, एक किलो मांस तयार व्हायला ७० किलो गवत खर्ची पडतं, जर हे ७० किलो गवत तयार करायला लागणारी जमीन वापरली तर माझ्या सारख्या गरीब देशातील ७० टक्के लोक एकवेळचं अन्न घेऊ शकतील. आपल्या आहारातील मांसाहार वर्ज्य करून शाकाहार घेतला तर धान्य, डाळी, भाज्या, मुळं, कंद, फळे, दूध यातून आवश्यक ती प्रथिने स्निग्धांश उष्मांक मिळत असतो. कच्च्या भाज्या, फळांमुळे, विकार बरे होतात व तंतुमय पदार्थामुळे पचनक्रिया सुधारते. *शाकाहार मांसाहाराच्या योग्य योग्यतेचा आणि आपल्या शरीर रचनेचा विचार केला तर आपल्याला शाकाहाराचे महत्त्व पटेल.*
*निसर्गात ढवळाढवळ न करता सर्वांनीच मांसाहार टाळला पाहिजे व आज तेच योग्य आहे.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
27 मार्च 2022.
Comments
Post a Comment