चला व्यसनमुक्ती कडे... साहेबराव माने.. पुणे.. 9028261973.. 20 मार्च 2022.
*चला व्यसनमुक्त समाज घडवूया ...*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - डॉ. प्रकाश शिंदे.
मो 9226757494.
20 मार्च 2022.
व्यसन एक आजार आहे, हे मान्य केलं की त्याचे टप्पे निश्चित करावे लागतात.
व्यसनाची अगदी पहिली पायरी म्हणजे प्रयोगशीलता. या पायरीवर दारू, गांजा,
बीअर यांचा परिचय होतो. उत्सुकतेपोटी, समारंभात, जत्रेत व्यसनाचा वापर केला
जातो. यात प्रामुख्याने मजा घेणं अपेक्षित असतं. अगदी दारुबद्दल बोलायचं तर
कधीतरी पार्टीत, मित्रांसोबत 'कंपनी' म्हणून दारू प्यायला सुरुवात होते. क्वचित
काहीजण पहिल्यांदा दारू घेतल्यावर व्यसनी होतात. पण त्यासाठी साधारणपणे
किमान दहा वर्ष किंवा अधिक काळही जाऊ शकतो. ह्याच्या पुढ्च्या टप्प्यात मित्रांबरोबर पिणं ,फार थकवा आला असेल किंवा तणाव आला असेल तर पिणं चालू होतं.हळू हळू ती सवय बनायला लागते,पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दारूचं प्रमाण वाढू लागतं, त्याला सर्वसामान्य भाषेत 'कोटा' वाढणं अस म्हणतात त्याच प्रमुख कारण म्हणजे शरीराची दारू सहन करण्याची क्षमता वाढू लागते.
खरं तर आपल्या जीवनात एखादी व्यक्ती निर्व्यसनी करणे यापेक्षा मोठी कुठलीच समाजसेवा मला वाटत नाही तरी जी माणसं निर्व्यसनी आहे त्यांनी एखाद्या व्यसनी व्यक्तीला आपल्या जवळ करून त्याला व्यसनमुक्त करा त्याच्या लेकरा बाळा ने परिवाराने दिलेला आशीर्वाद कुठल्याही देवाच्या आशीर्वादा पेक्षा कमी असू शकत नाही असं माझं मत आहे आपल्या परीसरात, गावात जर कोणी दारू व्यसनाधीन रुग्ण असल्यास आमच्या कडे पाठवा . ३० वर्षे अनुभव आहे आजवर अनेक दारू पासून व्यसनमुक्त झाले आहेत
पत्ता
डॉ प्रकाश शिंदे
चिंतामणी हॉस्पिटल
दारू व्यसनमुक्ती केंद्र
मयूर विहार कॉलनी
पावडे वाडी नाका
नांदेड
मो 9226757494.
चला व्यसनमुक्ती कडे ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे.
9028261973.
20 मार्च 2022.
Comments
Post a Comment