*विज्ञानवादी ध्येय्याने झपाटलेला माणूस - संजय पुजारी.*+91 92261 63260*🎂28 फेब्रुवारी 1964🎂**(🎂संजय पुजारी🎂 हे आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी आहेत. आज 28 फेब्रुवारी. त्यांचा वाढदिवस आहे.)* संकलन - साहेबराव मानेपुणे. 9028261973साभार - जगदीश काबरे28 फेब्रुवारी 2024
https://www.youtube.com/live/YJ-ZNYRpmos?si=YkwHFON7DZVFLWoq
*विज्ञानवादी ध्येय्याने झपाटलेला माणूस - संजय पुजारी.*
+91 92261 63260
*🎂28 फेब्रुवारी 1964🎂*
*(🎂संजय पुजारी🎂 हे आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी आहेत. आज 28 फेब्रुवारी. त्यांचा वाढदिवस आहे.)*
संकलन - साहेबराव माने
पुणे. 9028261973
साभार - जगदीश काबरे
मावळ वार्ता
28 फेब्रुवारी 2024
*_विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि इतरांना फॉरवर्ड करा._*👇
https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*👇
https://Sahebraomane1967.blogspot.com
आजचे विज्ञान युग असल्यामुळे बरेचदा आपल्या कानावर 'माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगावे' अशा अर्थाचे वाक्य अधूनमधून पडत असते. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगावे म्हणजे नेमके कसे, हे फारसे कुणी समजावून देतच नाही. खरे तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 'पुरावा जेवढा, तेवढा विश्वास'. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध होतो. पण शाळेत शिकवणारे बव्हंशी शिक्षक पुस्तकी ज्ञान देण्यापलीकडे विज्ञानाचा दृष्टिकोन मुलांमध्ये जागृत करण्याचे फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. तरीही अशा प्रवाहपतीत शिक्षकांमधून प्रवाहाच्या विरोधात पोहोणारे धाडसीवीर निर्माण होत असतातच. त्यामुळेच आजच्या अंधश्रद्धयुक्त भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्यासाठी मुलांना कार्यरत करणारी काही मंडळी अजून अस्तित्वात आहेत, हे पाहून समाधान वाटते.
अशाच ध्येयाने झपाटलेले एक विज्ञाननिष्ठ शिक्षक म्हणजे डॉ संजय पुजारी! यांनी कऱ्हाडसारख्या लहानशा गावात शालेय शिक्षणानंतर वेळ काढून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा म्हणून 'कल्पना चावला विज्ञान केंद्र' निर्माण केले आणि शनिवार-रविवारची एक आगळीवेगळी शाळा सुरू केली. त्यात त्यांनी हसत खेळत विज्ञानाचे अनेक गमतीशीर प्रयोग केलेच; पण मुलांनाही ते स्वतः करायला लावून त्यांची विज्ञानात गोडी निर्माण केली. हळूहळू त्यांची कीर्ती पसरू लागली आणि या केंद्रावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळा विद्यार्थ्यांना घेऊन भेटी देऊ लागल्या. त्याचबरोबर ते महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या शाळांमधून विज्ञान प्रसाराचे कार्यक्रम करू लागले. त्यांच्या या कार्याची दखल 'मराठी विज्ञान परिषदे'ने घेतली आणि त्यांना 'विज्ञान प्रसारक' म्हणून पुरस्कार दिला. जनमानसात विज्ञान रुजवण्याच्या कामी त्यांची कीर्ती कालांतराने एवढी पसरली की, त्यांना 'विज्ञान प्रसारक' म्हणून राष्ट्रपती पारितोषिकाने गौरवले गेले. भारताचे मिसाइल मॅन आणि त्या वेळचे राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारले.
एकदा लोणावळ्यातील 'बापूसाहेब भोंडे' या शाळेचे विश्वस्त माधवराव भोंडे यांनी या केंद्राला भेट दिली आणि ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी संजय पुजारी यांना त्यांच्या शाळेतील सुमारे 15 हजार स्क्वेअर फुट जागा देऊन हे विज्ञान केंद्र लोणावळ्यात सुरू करण्याचे आमंत्रण दिले. संजय पुजारी त्यावर विचार करू लागले. शिक्षकी पेशातून रीतसर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या आमंत्रणाचा स्वीकार करून गेल्या वर्षी लोणावळ्याला 'कल्पना चावला विज्ञान केंद्र' हलवण्याचा विचार निश्चित केला. पण हे करताना त्यांनी पुढची झेप घेतली. या केंद्रात मुलांमध्ये नुसतेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून थांबवायचे नव्हते तर भविष्यात भारतात अवकाशवीर निर्माण व्हावेत यासाठी त्यांनी 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी'ची सुरुवात करण्याचे ठरवले. या कामी त्यांना शिक्षणाची आवड असणारे नवी मुंबईतील एक उद्योजक दानशूर नारायण भार्गव यांचे भरघोस आर्थिक सहाय्य मिळाले. माधवराव भोंडे यांनी शाळेची जागा तर दिलीच होती; त्या जागेत नारायण भार्गव यांच्या मदतीने 'स्पेस अकॅडमी'ची सुरुवात करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे संजय पुजारी तरुणाच्या उत्साहाने कामाला लागले. या कामी त्यांना 'रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा'चे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर, डॉ भाभा अणूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ व्यंकटेश गंभीर, डॉ जगदीश मठ या महानुभवांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम तयार करून दिला. अशाप्रकारे सगळी सुसज्ज तयारी झाल्यानंतर 28 ऑक्टोबर 2023 ला 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी'चा दिमाखदार उद्घाटन सोळा पार पाडला. कल्पना चावलाचे कर्तृत्व विशद करणाऱ्या गीताबरोबर एक लहान रॉकेट आकाशात उडवून या कार्यक्रमाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आखीव-रेखीव सूत्रसंचालन शिक्षिका आणि शाळेच्या एक संस्थापिका असलेल्या राधिका भोंडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर आणि इस्रोचे अवकाश संशोधक डॉ सुधीर कुमार हजर होते. 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी'चे आधारस्तंभ नारायण भार्गव यांनी या स्पेस अकॅडमीची ध्येयधोरणे सांगताना हुशार पण गरीब विद्यार्थ्यांनाही वाव मिळावा म्हणून सहाय्य करणार असल्याचे त्यांच्या मनोगतुन व्यक्त केले. अनिल काकोडकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भाष्य केले. तसेच चांद्रयान मोहिमेची यशोगाथा सांगितली आणि त्याच वेळेस भविष्यात अवकाश शास्त्रात भारत अग्रगण्य होणार असल्याची ग्वाही देत 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी'ने त्याची सुरुवात केली आहे असे कौतुक केले. जोपर्यंत 'का?' या प्रश्नाचा मागोवा घेणारे निर्माण होत नाहीत तोपर्यंत नवीन शोध लागणे कठीण! 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी' अशाप्रकारे विचार प्रवृत्त करणारे विद्यार्थी तयार करेल, असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. इस्रोचे अवकाश संशोधक डॉ सुधीर कुमार यांनी या कामी इस्रोकडून लागेल ते सहाय्य करण्याचे भरघोस आश्वासन दिले.
असे म्हणतात, 'Well start half done' या उक्तीनुसार सुरुवात तर चांगली झाली. आता खरी कसोटी आहे ती संजय पुजारी आणि त्यांनी तयार केलेल्या चमूची. पुढच्या वर्षापासून पन्नास मुलांची पहिली बॅच सुरू होणार आहे. त्यांच्या यशस्वीतेवरच 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी' कशी आणि किती उंच भरारी घेते हे अवलंबून राहणार आहे. त्यासाठी हे अर्थात हे वैज्ञानिक धनुष्य पेलण्यासाठी ध्येयवादी संजय पुजारी तेवढ्याच ताकदीने तयार असून कामाला लागलेले आहेत. त्यामुळे भविष्यात ते निश्चितच यशस्वी होतील याची मला खात्री आहे.
13 जानेवारी 2024 रोजी संजय पुजारी हे दिल्ली येथे कल्पना चावला यांच्या घरी काही दिवस मुक्कामी होते.
कल्पना चावलाच्या काही भेटवस्तू आणि तिच्या वडिलांच्या काही आठवणी चावला कुटुंबीयांनी संजय पुजारी यांच्या कडे सुपूर्त केल्या आहेत.
त्या अनमोल आठवणी कल्पना चावला स्पेस अकॅडमी लोणावळ्यासाठी बहुमूल्य आहेत. सोबत फोटो दिले आहेत.
फोटोमध्ये पापाजींनी जो ओव्हरकोट घातलेला आहे तो मिळाला. कल्पना चावला जेव्हा STS107 कोलंबिया बरोबर स्पेस मध्ये गेली तेव्हा तिला भेटण्यासाठी पापाजी नासामध्ये गेले तेव्हा हा कोट घातला होता या कोटला कल्पना चावलाने स्पर्श केला आहे आणि वडिलांना मिठी मारून त्यांचे प्रेमळ आशीर्वाद घेतले आहे तो प्रेमाचा कोट म्हणजे आपल्यासाठी आशीर्वादच आहे.
या पवित्र कोटाला केवळ कल्पना चावलाचा स्पर्श नसून त्या सातही अंतराळवीरांचा स्पर्श आहे या छायाचित्रात कल्पना चावलाचे आई-वडील आणि कल्पना चावला सह ते सातही अंतराळवीर दिसत आहेत.
*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9027261973*
Comments
Post a Comment