*अविनाश ढोली... आणि वाल्ल्याचा वाल्मिकी झाला.* "चला व्यसनमुक्ती कडे." .. साहेबराव माने. पुणे. 90282619738 आक्टोंबर 2023

*अविनाश ढोली -... आणि वाल्ल्याचा वाल्मिकी झाला.*

*चला व्यसनमुक्ती कडे.*
संकलन - साहेबराव माने
पुणे 9028261973
साभार - अविनाश ढोली
नाशिक 9604061833


*(अविनाश ढोली हे 'चला व्यसनमुक्ती कडे' ग्रुप चे सन्मानिय सदस्य आहेत.)*
लेखन - ममता क्षेमकल्याणी
8 आक्टोंबर 2023


*सहभागी व्हा आणि फाॅरवर्ड करा.*👇

https://chat.whatsapp.com/K5SUvCyDq4Y73eBYep7q1x

*कायम दारूच्या व्यसनात बुडालेल्या अविनाशने आपल्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत करू घेतली होती. मुक्तांगणमधील वास्तव्य आणि त्यानंतरचा फॉलोअप यातून अनेक सकारात्मक गोष्टी अविनाशला मिळाल्या आणि वाल्याचा वाल्मिकी व्हावा, तसा अविनाशला नवीन जन्म मिळाला तो मुक्तांगणमध्ये. त्याची ही यशोगाथा...*

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://Sahebraomane1967.blogspot.com

'सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला थोरला मुलगा अविनाश ढोली, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी या छोटयाशा गावात त्याचं बालपण आनंदात गेलं. आठवीपर्यंतच्या शालेय शिक्षणात चमकणारा अविनाश शिष्यवृत्ती परीक्षांमध्येदेखील अव्वल आला. मुलांच्या शिक्षणाचा विचार करून त्याच्या वडिलांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. दोन धाकटे भाऊ आणि आई- वडिलांसह नाशिकमध्ये रुळलेल्या अविनाशने लोणी- प्रवरा येथे अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. पहिलं वर्ष अगदी सुरळीत गेलं खरं, पण अविनाश दुसऱ्या वर्षाला असताना नेमका घात झाला. कॉलेजमध्ये अगदी जुजबी ओळख असलेल्या एका मुलाच्या आग्रहावरून बिअरचा अर्धा ग्लास रिचवणारा अविनाश पाहता पाहता दारूच्या इतका अधीन गेला की, त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षे अक्षरशः उद्ध्वस्त झाली.
बीअरचा पहिला घोट प्यायल्यानंतर त्याच्या चवीमुळे आपण याला परत हातही लावू शकणार नाही. अस वाटत असलेला अविनाश दर दोन महिन्यांनी 'त्या' मित्राला जास्तीचे पैसे देऊन बीअर मागवू लागला. या नशेची झिंग त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्याचे शरीर आणि मन दोन्हीही नशेच्या पुढच्या अपेक्षा करू लागले. कसंबसं इंजिनीअरिंग पूर्ण करून परत नाशिकला आलेल्या अविनाशने कॉम्प्युटर सर्व्हिस सेंटरचा व्यवसाय सुरू केला. मात्र अत्यंत विनयशील, कामसू आणि नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अविनाशचे रूपांतर दारू प्यायल्यानंतर अक्षरशः हेवानामध्ये व्हायचे. घरातून बाहेर जाताना सोसायटीतल्या सगळ्या मावशी काका आणि मित्रांशी हसतखेळत बोलणारा अविनाश रात्री दीड-दोन वाजता दारू पिऊन परत यायचा तोच सोसायटीच्या गेटपासून मोठ्या मोठ्याने शिव्या देत आणि शेजारपाजारच्यांच्या दारांवर लाथा मारतच.

लग्नानंतर मुलगा सुधारेल या भाबडया आशेवर घरच्यांनी निफाडमधील बारावी झालेल्या एका मुलीबरोबर अविनाशचे लग्न लावून दिले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि मुलगा सुधारण्याऐवजी त्याचा अत्याचार सहन करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणखी एकीची भर पडली. अविनाशबरोबर मांडलेल्या संसारात तिने ज्या हालअपेष्टा, मारहाण आणि अत्याचार सहन केला त्याविषयीची खोल अपराधी भावना आजही अनेकदा अविनाशला जखमी करीत असते. आई, वडील, भाऊ, बायको, मुलगा यापैकी कोणीच त्याच्या अत्याचारातून सुटले नाहीत. निदान मूल झाल्यानंतर तरी अविनाशमध्ये बदल होईल. ही दुसरी आशापण अविनाशच्या व्यसनाने खोटी ठरवली. मुलाचं संगोपन करणं तर दूरच, पण त्याच्या बाललीलांचा आनंदही अविनाशने कधी घेतला नाही. अगदी लहान असल्यापासूनच आर्यन त्याच्या वडिलांना घाबरूनच होता. चोवीस तास दारूच्या नशेत बुडणारा अविनाश दिवस दिवस घराबाहेर रहायचा. कधी ओळखीच्या रिक्षा स्टॉपवर रांगेतल्या शेवटच्या रिक्षेत बसून, तर कधी पंपिंग स्टेशनजवळ 1 असलेल्या होड्यांमध्ये बसून दारू रिचवणाऱ्या - अविनाशवर हर तऱ्हेचे उपचार केले गेले. अंगारा-धुपाऱ्यापासून न सांगता दारू सोडवणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरांपर्यंत अनेक प्रयत्न करून झाले पैसादेखील खर्च होऊ लागला, पण अविनाशचं दारूचं व्यसन सुटता सुटेना. अर्थात सर्वतोपरी सुरू असलेल्या या  प्रयत्नात एक आशेचा किरण होता तो म्हणजे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र.

दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनिता अवचट यांच्या प्रयत्नातून पुणे येथे सुरू झालेल्या मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या कार्यात दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे. आपल्या मुलालादेखील व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मुक्तांगणचा मार्ग त्याच्या पालकांसह हितचिंतकांनी घेतला.  आपल्या व्यसनमुक्तीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार होणाऱ्या कुटुंबियांच आपण एकदातरी ऐकायला हवं. असा निर्णय अविनाशनेही घेतला. अर्थात मुक्तांगणमध्ये जाण्यासाठी त्याच्या मनाची तयारी करण्यात मुक्तांगणचे नाशिकमधील समुपदेशक संदीप धोपावकर आणि समुपदेशक परेश कामदार या कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.. *वाल्याचा वाल्मिकी व्हावा तस मुक्तांगणमधील ३५ दिवसांच्या वास्तव्याने अविनाशचा पुनर्जन्म झाला.*
आपण मुक्तांगणमध्ये आलो ते केवळ घरातल्यांच्या समाधानासाठी अशी भावना सुरुवातीला अविनाशच्या मनात होती. त्यामुळे मुक्तांगणमधील सकाळपासूनचे रुटीन केवळ तांत्रिकपणे तो फॉलो करीत होता. मुक्तांगणमध्ये सकाळी योगा, सगळ्यांसाठी एकत्रित मार्गदर्शन सत्र, वेगवेगळ्या बॅचचे स्वतंत्र मार्गदर्शन सत्र, कवायत असे साधारण दिवसभरातील वेळापत्रक असते. सुरुवातीला अनेक जण केवळ घरातल्यांच्या समाधानासाठी शरीराने मुक्तांगणमध्ये रहात असतात. मात्र वेगवेगळ्या मार्गदर्शन सत्रांमुळे प्रत्येकाचे मन अगदी अल्पावधीतच इथे रमायला लागते.
अविनाशच्या बाबतीतदेखील असेच झाले.
पण एक दिवस मुक्तांगणच्या ज्येष्ठ मार्गदर्शक प्रफुल्ला मोहिते ज्यांना सगळा मुक्तांगण परिवार प्रफुल्ला आत्या म्हणूनच ओळखतो त्यांचे कुटुंब आणि नातेसंबंध' या विषयावर मार्गदर्शन सत्र सुरू होते. त्या वेळी त्यांनी विशद केलेले कुटुंबाचे महत्त्व अविनाशला चांगलेच भावले.

मुक्तांगणमध्ये अनेक मार्गदर्शन होतात आणि त्याचबरोबर प्रत्येकाचे वैयक्तिक समुपदेशकदेखील असतात. मुक्तांगणमध्ये आल्यानंतरचं पहिलं वर्ष जास्त महत्त्वाचं असतं कारण या काळात सोयायटी टिकवणं हे फार मोठं आव्हान असतं. कारण या पहिल्या वर्षात व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वतःवर ताबा मिळवणं हे कठीण काम असतं. मुक्तांगण मित्र हे सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने रोल मॉडेल्स आहेत. मुक्तांगणमधील ३५ दिवसांचे वास्तव्य आणि त्यानंतरचा फॉलो अप फार महत्त्वाचा असतो. यातून अनेक सकारात्मक गोष्टी मुक्तांगण मित्रांना मिळतात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या फॉलोअप मीटिंगला सगळे मुक्तांगण मित्र त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी होत असतात. मुक्तांगणमध्ये या फॉलोअपला खूप जास्त महत्त्व दिले जाते. मुक्तांगणमधील वास्तव्यात मिळालेल्या भावनिक, वैचारिक आणि बौद्धिक खाद्याचा प्रत्यक्ष जीवनात नेमका कशा प्रकारे वापर होतो आहे. हे फॉलोअपच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होते. शिवाय इतर मुक्तांगण मित्रांच्या यशोगाथा सगळ्यांचेच बळ वाढवणाऱ्या असतात. 'तरी बरं... हा मुक्तांगणच्या विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर यांचा मंत्र आयुष्यातील कोणत्याही प्रसंगातून सावरण्याचे बळ देतो. यावर अविनाशचा ठाम विश्वास आहे. तर मुक्तांगणचे आधारवड ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांचा मोलाचा सहवास अविनाशाला नेहमीच प्रेरणा देणारा ठरला आहे. तसेच मुक्तांगणमधील सहवासापासून अविनाशला पर्सनल कौन्सिलर नितीन देऊसकर आणि कौन्सिलर दत्ता श्रीखंडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आणि आजही मिळते आहे. जुलै २०१० मध्ये मुक्तांगणला दाखल झालेला अविनाश एक महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट २०१० मध्ये उपचार घेऊन बाहेर आला. मुक्तांगणमधील ३५ दिवस, त्यानंतरच्या पहिल्या वर्षातील कठोर संयम आणि गेल्या अकरा वर्षांतील काटेकोर फॉलोअप या सगळ्यामुळे आज अविनाशचे कुटुंब खूप आनंदात रहात आहे. अविनाशसह त्याच्या कुटुंबाचा जणू नवीन जन्मच झाला आहे.

 mamatakshem@gmail.com
*चला व्यसनमुक्ती कडे ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

*रोज आपण ज्यांची पूजा करतो, त्या देवी-देवतांना रूप दिलंय राजा रवी वर्मा या अद्भुत चित्रकाराने….!*संकलन - साहेबराव माने.पुणे. 9028261973.29 एप्रिल 2022.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.