*_9 आक्टोंबर - जागतिक टपाल दिवसाच्या निमित्ताने - पोस्टकार्ड /टपालाच्या माध्यमातून शिक्षणाची भगीरथ गंगा खेडोपाडी पोहोचवणाऱ्या पोस्टकार्ड मॅन 'प्रदिप लोखंडे' सोबत गप्पा._**"प्रदिप लोखंडे. पुणे 13" : एक पोस्टकार्ड टाकून पाहा...*संकलन - साहेबराव माने. पुणे - 9028261973. साभार - ABP माझा. 9 आक्टोंबर 2023.

*_9 आक्टोंबर - जागतिक टपाल दिवसाच्या निमित्ताने - पोस्टकार्ड /टपालाच्या माध्यमातून शिक्षणाची भगीरथ गंगा खेडोपाडी पोहोचवणाऱ्या पोस्टकार्ड मॅन 'प्रदिप लोखंडे' सोबत गप्पा._*

https://youtu.be/TsnsiZXuDtg

*"प्रदिप लोखंडे. पुणे 13" : एक पोस्टकार्ड टाकून पाहा...*
संकलन - साहेबराव माने.  
पुणे - 9028261973. 
साभार - ABP माझा. 
9 आक्टोंबर 2023. 
*प्रदिप लोखंडे - रुरल रिलेशन 👇*

https://youtu.be/BJtHdaiqoYU

*ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे. तुम्ही सहभागी व्हा आणि ओळखीच्या व्यक्तींसाठी पोस्ट फाॅरवर्ड करा.*👇

https://chat.whatsapp.com/FLVTkZ5rlwtD9OoHZmpvG3

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://Sahebraomane1967.blogspot.com

आज 9 आक्टोंबर. आंतरराष्ट्रीय टपाल दिवस. “प्रदीप लोखंडे, पुणे, महाराष्ट्र” केवळ इतकंच नाव आणि पत्ता असलेले पोस्टकार्ड जर एखाद्या व्यक्तीला बरोबर पोहोचत असेल तर, अशा व्यक्तीला काय म्हणतात?
कारण दररोज या नावावर शेकडो पोस्टकार्ड येत असतात. एकतर टेलिफोनचे युग सुरू झाले आणि पोस्ट कार्डचा वापर कमी झाला. त्यानंतर आलेल्या मोबाईलने तर पोस्टकार्डला निरुपयोगीच ठरवले. पोस्ट ऑफिसची अवस्था दयनीय झाली. अशा काळात एखाद्या माणसाला इतकी पोस्टकार्ड येत असतील तर त्या माणसाला “पोस्टकार्ड मॅन” असंच म्हटलं जाईल.

असा एक पोस्टकार्ड मॅन आपल्या भारतात, महाराष्ट्रात आहे त्यांचं नाव प्रदीप लोखंडे. ते पुण्यात राहतात. भारतातील खेडी आणि शहरे यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी पोस्ट कार्डचा वापर केला.

आणि अजूनही ते त्याचा वापर करीत आहेत. आता प्रश्न पडेल की खेडी आणि शहरे यांच्यामधील संवाद का आणि कशासाठी साधला जातो?

त्याच कारण म्हणजे महाराष्ट्रातील ३०५५ खेड्यांमधल्या लायब्ररीज प्रदीप लोखंडे यांच्या मदतीने सुरु करण्यात आल्या.

त्यांनी त्यांची ही चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न करता संपूर्ण देशभरातही काही राज्यांमध्ये चालू केली आहे. आणि त्यासंदर्भातली पोस्टकार्ड त्यांना येत राहतात.

आता असेही वाटेल की इतक्या लायब्ररीज त्यांनी चालू केल्या म्हणजे नक्कीच ते खूप श्रीमंत असतील. पण ते तसं नाहीये ते एक सामान्य नागरिक आहेत. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका मल्टिनॅशनल कंपनीत त्यांना नोकरीही मिळाली. तिथे काही काळ घालवल्यानंतर त्यांना या चळवळीकडे लक्ष द्यावं असं वाटलं.

याचं कारण म्हणजे २०१० मध्ये असं म्हटलं जात होतं की, लोकांची वाचनाची आवड कमी होत आहे. आणि थोड्याच दिवसात वाचन करणे लोकांना आवडणारच नाही असंही म्हटलं जात होतं.

एका अर्थाने म्हणाल तर ही परिस्थिती गंभीर आहे. कारण वाचनामुळे माणूस शिकतो त्याला अनेक विषयांची माहिती होते आणि केवळ त्या पुरतीच ती मर्यादित न राहता त्या माहितीबरोबरच माणूस विचार करायला शिकतो.
वाचन थांबलं म्हणजेच विचार प्रक्रिया ही थांबेल. पुस्तकांमधूनच तर ज्ञान मिळतं. म्हणजेच ‘वाचाल तर वाचाल’ हे किती खरे आहे. म्हणजेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे किती गरजेचे आहे याची त्यांना जाणीव झाली.

म्हणूनच कदाचित त्यांनी त्यांच्या चळवळीला नाव दिलं “ग्यान की”. म्हणजेच ज्ञानाची चावी.
*वैज्ञानिक दृष्टिकोण 9028261973*
शहरांमधील मुलांना पुस्तकं, पुस्तकांच्या दुकानातून, लायब्ररीमधून वाचायला मिळतात. मात्र खेड्यांमधील मुलांना ही सोय उपलब्ध नसते आणि तिथली मुलं शिकली वाचली तरच भारत सुसंस्कृत होईल याची जाणीव प्रदीप लोखंडे यांना झाली. त्यासाठी काय करता येईल यासाठी त्यांचा विचार सुरू झाला.

त्यासाठी मग त्यांनी महाराष्ट्रातील सगळे जिल्हे, तालुके त्यामधील खेडी पिंजून काढली आणि त्या भागामध्ये मुलांना कोणत्या प्रकारची पुस्तक वाचायला आवडेल याचा एक कल त्यांनी घेतला.

त्यांच्या लक्षात आलं की मुलांना वाचायचं आहे परंतु पुस्तक नाही. मग हीच कमी दूर करायचं त्यांनी ठरवलं.

आता ती पुस्तके त्या मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी लोकांना पुस्तकं देण्याचं आवाहन केलं. त्यांनी असं नाही सांगितलं की मला यासाठी पैसे हवेत.

त्यासाठी त्यांनी पुस्तकांची मागणी केली. अगदी वापरलेली असतील तरी चालेल असं सांगितलं. मग हळूहळू लोकांनी त्यांना पुस्तक द्यायला सुरुवात केली.

ही पुस्तकं प्रदीप लोखंडे यांनी त्या गावांपर्यंत पोहोचवली.

परंतु *त्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक कोणी दिले आहे त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता असलेले पोस्टकार्ड/टपाल ठेवायला सुरुवात केली आणि या पुस्तकाविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्यक्तीला सांगा असं सांगितलं.*

त्यांची हीच कृती खरंतर खूप वेगळी ठरते. कारण त्यामुळे देणाऱ्या व्यक्तीला आपली मदत योग्य ठिकाणी पोचली आहे याचं समाधान मिळतं, तर पुस्तक वाचणार्‍या मुलांनाही पुढे जाऊन आपणही असं काही करावं अशी प्रेरणा मिळते.

मध्यप्रदेश कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये त्यांनी अशा लायब्ररीज काढल्या आहेत.

त्यामुळे १० लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. आणि प्रदीप लोखंडे यांना विश्वास आहे की पुढेही अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. 

आतापर्यंत ८५०००० विद्यार्थ्यांनी अशी पोस्टकार्ड/टपाल पुस्तक देणाऱ्या व्यक्तींना पाठवली आहेत. प्रदीप लोखंडे यांच्या या चळवळीला यश येतं आहे.

खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी त्यांचा ध्यास सुरूच आहे.

जेव्हा शाळांमधून कॉम्प्युटर हा विषय अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आला त्यावेळेस देखील त्यांच्या लक्षात आलं की खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये कॉम्प्युटर बघायलाही मिळत नाही.

मग त्या विषयात ही मुलं काय शिकणार?

म्हणून मग त्यांनी कॉम्प्युटरचीही अशीच एक योजना काढली. ज्यामध्ये ज्या लोकांना जुने कॉम्प्युटर नको आहे, नवीन घ्यायचा आहे त्या लोकांनी जुने चालू स्थितीतील कॉम्युटर शाळेला दान द्यायचे.

अशा लोकांना ते भेटले आणि ज्या शाळांना गरज आहे त्या शाळांशी देखील त्यांनी संपर्क साधला आणि कॉम्प्युटर शाळेपर्यंत पोहोचते केले.

शाळेच्या गरजेनुसार कॉम्प्युटर त्यांनी दिले. देणाऱ्यांना त्यांनी कधीही सक्ती केली नाही की नवीनच कॉम्प्युटर द्या. जुना असला तरी चालेल पण तो व्यवस्थित चालणारा असावा इतकीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकदा शाळेला कॉम्प्युटर सोपवल्यावर त्या कॉम्प्युटरची संपूर्ण व्यवस्था शाळेनेच करायची.

आताही कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या शाळा बंद आहेत तर काही शाळांनी आता ऑनलाइन पद्धतीने अभ्यास चालू केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे.

कारण त्याद्वारे व्हिडिओ पाहता येतात ऑनलाईन क्लास जॉईन करता येतो. शिक्षकांना शंका विचारता येतात.

अर्थात शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्यास कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कारण इथल्या मुलांकडे देखील अँड्रॉइड मोबाईल्स असतात.

पण खरा प्रॉब्लेम आहे तो गावांकडे. तिथे प्रत्येकाकडेच मोबाईल असेल याची खात्री नाही, फार तर एखादा मोबाईल घरामध्ये असतो. आणि तोही अँड्रॉइड नसेल तर मुलांच्या शिक्षणात नक्कीच अडथळा येणार आहे.

ही अडचण ओळखून सध्या प्रदीप लोखंडे यांनी मोबाईल डोनेशनची कल्पना मांडली आहे.

ज्यानुसार शहरांमधल्या ज्या लोकांना जुना मोबाईल नको आहे त्या लोकांनी नवीन मोबाईल घेताना, आपला जुना चालू स्थितीतील मोबाईल या गरजू विद्यार्थ्यांना दान करावा.

जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांना एकदम पैसे घालून मोबाईल घेता येणार नाही त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे. पुढं मोबाईलचा रिचार्ज वगैरे गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बघाव्यात असं त्यांना वाटतं.

टाळी दोन्ही हाताने वाजली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.

तिथेही त्यांनी ही व्यवस्था एकदम पारदर्शक ठेवली आहे. त्यांच्याकडे सध्या किती विद्यार्थ्यांना मोबाईलची गरज आहे याची माहिती आहे.

म्हणूनच ज्यांना मोबाईल दान करायचा आहे त्यांनी तो कुठे, कोणत्या जिल्ह्यातल्या शाळेत दान करायचा आहे हे सांगितलं तरी त्या शाळेचा पत्ता दानी व्यक्तीकडे दिला जातो.

त्या व्यक्तीने परस्पर त्या शाळेत तो मोबाईल पाठवायचा आहे. म्हणजेच लॉक डाऊनच्या काळातही शिक्षणाची ग्यान की त्यांनी उघडली आहे.

प्रदीप लोखंडे यांच्याकडे त्यांच्या व्यवसायासाठी लागणारा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या गावांचां एक सर्वसाधारण डेटा उपलब्ध आहे.

ज्यानुसार जिल्हा, तालुका, खेडी याबरोबरच खेड्यांमध्ये असलेली पायाभूत सुविधा यांचीदेखील माहिती त्यांच्याकडे आहे.

ही माहिती जमा करताना त्यांना खेड्यातल्या समस्या देखील समजल्या आहेत. म्हणूनच शहरातल्या लोकांच्या मदतीने खेड्यातल्या समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल आहे.

नुसतंच खेड्याकडे चला म्हणून चालणार नाही. तर तिथे राहण्यासाठी तिथल्या लोकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

म्हणूनच तिथे उपलब्ध असणाऱ्या साधन सुविधेचा, नैसर्गिक घटकांचा खेड्यांच्या विकासासाठी कसा वापर करता येईल यासाठी देखील त्यांच्या काही योजना आहेत.

कारण खेडी सुधारली तरच भारत सुधारेल यावर त्यांचाही विश्वास आहे.

देशसेवा केवळ बॉर्डरवरच करता येत नाही तर ती अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ही करता येते, हेच प्रदीप लोखंडे यांनी दाखवून दिलं आहे. प्रदीप लोखंडे यांसारखी माणसे समाजामध्ये आहेत म्हणूनच भारताचे भविष्य उज्वल आहे.

*आंतरराष्ट्रीय टपाल दिवसाच्या निमित्ताने पोस्ट क्रमांक 2*
👇

*"प्रदिप लोखंडे. पुणे 13" : एक पोस्टकार्ड टाकून पाहा...*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - किरण शिवहर डोंगरदिवे. म. टा. 
9 आक्टोंबर 2023 
आज पत्रव्यवहार कमी झाला असला तरी याद्वारे आदान-प्रदान होते. बरीचशी पत्रे गहाळही होतात. मग मुद्दा येतो, पत्ता पुरेसा होता का? इथे आपल्या पूर्ण पत्त्याचे सोडा, 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या चार शब्दांच्या पत्त्यावर या मेट्रो शहरात रोज शेकडो पत्रे पोहचतात, यावर विश्वास बसत नाही. पत्र व्यवस्थित पोहचतेच; भावना कळल्या असे पत्राद्वारेच उत्तरही येते. चार शब्दांच्या पत्त्यावर ओळख सांगणारे हे प्रदीप लोखंडे आहेत तरी कोण, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

तर, अतिशय गरिबीतून अंधारभरल्या भाड्याच्या झोपडीत राहून, रफू केलेले ठिगळाचे कपडे वापरत, साधारण अर्धपोटी राहून शिक्षण घेत कोट्यधीश झालेला आणि कबिरांचा 'बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर।।' हा दोहा लक्षात ठेऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारणारा माणूस म्हणजे प्रदीप लोखंडे. बालपणापासून कधी मॅकेनिकच्या हाताखाली, तर कधी हँडमेड पेपर विक्री करणारा एजंट अशी कामे करत बीकॉम आणि 'मार्केटिंग'मध्ये डिप्लोमा घेऊन जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत नोकरी लागण्याच्या सुखद आठवणींसह कंपनी सोडण्यापर्यंतचे अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पुस्तकात मार्केटिंगमधील त्यांचे अनुभव सुमेध वडावाला यांनी शब्दबद्ध केले आहेत.

मार्केटिंग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत लोखंडे हे खऱ्या अर्थाने कोट्यधीश झाले. तद्‌वतच समाजसेवेचे भान म्हणून स्वत:ला तन, मन आणि धनासह समर्पित केले. २००० सालच्या 'वाय टू के' मुळे संगणक क्रांतीकडे जगाचे लक्ष वेधले गेले. भारत हा संगणक देश म्हणून ओळखला जायचा असेल, तर ग्रामीण भागातील मुलांना तो वापरता आला पाहिजे, असे त्यांना वाटले. या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पाच राज्यांतील ग्रामीण भागातील मुलांकडून 'We want computer literate. Why not? अशा मजकुराची टपाल, पत्रे राजकारणातील मान्यवरांना पाठविली. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी स्वत: 'अनिवासी गाववासी' या उपक्रमातून वाईजवळील मांढरदेव येथील शाळेत एक जुना संगणक बसवून दिला. पुढे हा महत्त्वाचा उपक्रमच झाला. ग्रामीण भागातील शाळाशाळांत नवे-जुने संगणक पोहचण्यास सुरुवात झाली. लोकांकडून मदत मिळवून २० हजार गावांत २८ हजार संगणक बसवले.

खेडेगावांत अतिरिक्त ज्ञान मिळवण्याची काहीच साधने नाहीत व शाळेत नेमलेली क्रमिक पुस्तके सोडली तर कुठलीच पुस्तके मुलांनी वाचलेली नाहीत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये ग्रंथालये निर्माण करायला सुरुवात केली. ही ग्रंथालये विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थीच त्यांची व्यवस्था पाहतात. महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश आदी राज्यांत अशी एकूण ३ हजार ६०० ग्रंथालये सुरू आहेत. सुमारे पाच कोटी रुपयांची ६ लाख २५ हजार पुस्तके दिली गेली आहेत. सुमारे साडेआठ लाख मुले या पुस्तकांचा लाभ घेत आहेत. एक ग्रंथालय स्थापन करण्यासाठी दात्याला प्रकाशकाच्या नावाने ६ हजार ७०० रुपयांची देणगी अपेक्षित असते. विकत घेतलेल्या पुस्तकांवर दात्याचे नाव, पत्ता असतो. जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, उदय निरगुडकर अशी त्यातील काही दात्यांची नावे आहेत. पुस्तक आवडले तर विद्यार्थी थेट दात्याला पोस्ट कार्ड टाकून त्यांचे आभार मानतात. यासोबच २००९ मध्ये 'बदलता गाव' या उपक्रमात गावागावांना मूलभूत सुविधा पुरविण्यात लोखंडे यांनी मोलाचे कार्य केले.

मार्केटिंगला सध्या किती महत्त्व आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मोठ्या कंपन्या जेव्हा फक्त शहरामध्ये मार्केटिंग करीत असत, त्या काळात लोखंडे यांनी 'रुरल मार्केटिंग' करत शहराबरोबरच खेड्यापाड्यांतील तरुणांना प्रत्यक्ष अनुभवातून मार्केटिंगचे शिक्षण दिले. ग्रामीण भागातील बाजाराचा आढावा, ग्राहकांचा प्रतिसाद याची टपाल, पत्राद्वारे माहिती गोळा करून त्याआधारे मार्केटिंगची संकल्पना राबविली. वाईसारख्या छोट्या गावातील गरिबीत वाढलेल्या प्रदीप लोखंडे यांचा हा एकूण प्रवास थक्क करणारा आहे. अनेक तरुणांना यातून प्रेरणा मिळेल व स्वयंरोजगारासाठी नवी दिशा सापडू शकेल, 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पत्त्यावर एक साधे कार्ड टाकून तर पाहा...
*_🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏_*
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973._*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

*रोज आपण ज्यांची पूजा करतो, त्या देवी-देवतांना रूप दिलंय राजा रवी वर्मा या अद्भुत चित्रकाराने….!*संकलन - साहेबराव माने.पुणे. 9028261973.29 एप्रिल 2022.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.