*"माझा गणेश नाही, मखरात मावणारा!"*
. *'माझा गणेश नाही, मखरात मावणारा'!* संकलन - साहेबराव माने पुणे. 9028261973 साभार - राज कुलकर्णी. एबीपी माझा. *ग्रुप सहभागी व्हा आणि इतरांना पोस्ट फॉरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/JTISVLWwn9t0Iv5cPULkXm?s=sw&p=a&ilr=1 https://chat.whatsapp.com/JTISVLWwn9t0Iv5cPULkXm?s=sw&p=a&ilr=1 *गणेश, विनायक, एकदंत, वक्रतुंड, गजानन आदी नावांनी ओळखला जाणारा गणपती ही देवता केवळ भारतात नव्हेतर ईराण, पाकीस्तान, अफगाणीस्तान पासून ते समस्त भारतीय भारतीय उपखंडासह श्रीलंका, भुतान, कंबोडीया, मलेशिया, इंडोनोशिया, थायलंड आदी देशातही विविध रूपात आणि विविध आख्यायिकांसह लोकप्रिय आहे.* पौराणिक, वैदिक, नाथसंप्रदायी, तांत्रिक पंथासह जैन व बौद्ध धर्मातही तीचा गौरव सर्वदुर आहे. अशी ही देवता मुळात व्रात्यांची विघ्नकारी देवता म्हणून प्रसिद्धीस असली तरी काळाच्या ओघात ती विघ्नहारी विनायक म्हणून तीने जनमानसांत स्थान मिळवले. जनतेच्या मनात ती अधिदेवता बनली आणि अधिनायकही या स्वरूपातही तीची पुजा व आराधना सुरू झाली. तीची लोकप्रियता एवढी की शाक्त आणि शैव या तीच्या पितृसंप्रदयाबरोबर...